करमाळा बाजार समिती निवडणूक,शिंदे गटाचा ‘एकला चलो’चा नारा

बागल गटाच्या मनसुब्यांना सुरुंग

 

करमाळा/गौरव मोरे – करमाळा बाजार समितीच्या निवडणूकीत बागल-शिंदे गटाची युती होणार असल्याच्या चर्चेला अखेर पूर्ण विराम मिळाला असून शिंदे गट स्वतंत्र लढणार असल्याचेही आता स्पष्ट झालेले आहे.

करमाळा बाजार समिती निवडणूकीत रंगत वाढली असून ही निवडणूक तिरंगी होणार की दुरंगी याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले होते.

या अगोदर आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी युती करून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केलेली होती तर काही दिवसांपासून बागल-शिंदे गट युती करून निवडणूक लढणार असल्याचेही जोरदार चर्चा तालुकाभर सुरू होती.

बागल-शिंदे गटाच्या युती करण्यासाठी हलचाली सुरू होत्या त्या संदर्भात बारामती येथे बैठक ही झालेली होती परंतु बागल-शिंदे गटाच्या युतीची आशा अखेर मावळली असून जि प अध्यक्ष संजय शिंदे यांच्या शिंदे गटाने एकला चलो रे चा नारा दिला असून आता बागल गट ही स्वतंत्र लढणार असून ही निवडणूक तिरंगी होणार यात काही शंका नाही.

You might also like
Comments
Loading...