करमाळ्याची जागा राष्ट्रवादीकडेच? माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या भुमिकेकडे लक्ष

करमाळा- आगामी विधानसभा निवडणूक कॉंग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढविणार असल्याचे संकेत दिले असून तसे झाल्यास करमाळ्याची जागा राष्ट्रवादीकडे जाणार हे जवळजवळ निश्चित झालेले आहे.नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या हल्ला बोल यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्यातून रश्मी बागल ह्या राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्याचे घोषणा केली. त्यानंतर रश्मी बागल यांनी विधानसभा निवडणूकीसाठी तशी तयारी सुरू केलेली आहे.

Loading...

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असल्यापासून करमाळ्याची जागा राष्ट्रवादीकडेच आहे परंतु २०१४ विधानसभा निवडणूकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले राष्ट्रवादीकडून रश्मी बागल तर कॉंग्रेसकडून माजी आमदार जयवंत जगताप लढले होते. या निवडणूकीत जि प अध्यक्ष संजय शिंदे हे भाजप पुरस्कृत लढले तर शिवसेनेकडून नारायण पाटील निवडणूक रिंगणात होते. आमदार नारायण पाटील यांनी या निवडणूकीमध्ये बाजी मारली.

सध्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडीचे वारे वाहत आहे, असे झाले तर करमाळ्याची जागा राष्ट्रवादीकडे जाणार हे जवळजवळ निश्चित झालेले आहे. त्यामुळे  माजी आमदार जयवंत जगताप यांची अडचण वाढणार आहे आगामी निवडणूक लढविण्यासाठी त्यांना अपक्ष किंवा दुसरा पक्ष शोधावा लागणार आहे.  सध्या तालुकाभर आमदार नारायण पाटील आणि जयवंत जगताप एकत्र येणार अशी चर्चा देखील सुरू आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला माजी आमदार जयवंत जगताप काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.Loading…


Loading…

Loading...