सर्व राज्यांना सीएए लागू करावाच लागेल,कपिल सिब्बल यांच्या वक्तव्याने कॉंग्रेसची गोची

नवी दिल्ली : नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) संसदेत मंजूर करण्यात आल्याने हा कायदा सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारक आहे. कोणतेही राज्य हा कायदा लागू करणार नाही, असे बोलू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केले आहे. कपिल सिब्बल यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेससह विरोधक बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे.

Loading...

सीएए मंजूर झाला आहे तर कोणतेही राज्य त्याची अंमलबजावणी करणार नाही असे म्हणू शकत नाही, ते शक्य नाही, तसे करणे घटनाबाह्य़ ठरेल, तुम्ही त्याला विरोध करू शकता, त्याबाबत विधानसभेत ठरावही करू शकता आणि केंद्र सरकारला ते मागे घेण्यास सांगू शकता, असेही सिब्बल म्हणाले.

सिब्बल हे केरळ साहित्य समारोहात बोलत होते. ते म्हणाले की, सीएए संमत झाल्यामुळे कोणतेही राज्य ते लागू करण्यास नकार देऊ शकत नाही. हे शक्य नाही, हे असंवैधानिक असेल. तुम्ही त्यांचा विरोध करु शकता. विधानसभेत प्रस्ताव संमत करु शकता. केंद्र सरकारला कायदा मागे घेण्याची विनंती करु शकता. पण हा कायदा लागू करण्यास नकार दिल्यास यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण