‘मोदीजी विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवू नका’

टीम महाराष्ट्र देशा : तंत्रज्ञान आपल्या नियंत्रणाखाली असल्यायला हवे. म्हणूनच तंत्रज्ञानाशी मैत्री हवी, पण त्याची गुलाम नको, असा सल्ला ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विद्यार्थी, शिक्षण व पालकांशी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधला.

याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. ते नवी दिल्ली येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, मोदी यांनी वेळ वाया घालवू नये,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Loading...

पुढे बोलताना सिब्बल म्हणाले, ‘मी पंतप्रधानांना विद्यार्थ्यांना एकटे सोडण्याचे आवाहन करू इच्छितो, कारण आता बोर्ड परीक्षेची तयारी करण्याची वेळ आली आहे. त्यांनी त्यांचा वेळ वाया घालवू नये. डिग्री घेतल्यानंतर त्यांच्याविषयी खुल्या चर्चा करायला हव्यात आणि सर्वांना हे माहित असले पाहिजे,’ असे ते म्हणाले.

दरम्यान, अभिनेते प्रकाश राज यांनी देखील मोदींवर टीका केली. ट्‌विटच्या माध्यमातून त्यांनी मोदींना त्यांची डिग्री दाखविण्यास सांगितले आहे. आपल्या ट्‌विटर हॅंडलवर त्यांनी लिहिले आहे की, ‘परीक्षेवर चर्चा करण्यापूर्वी डिग्री पेपर दाखवा,’ अशी टीका प्रकाश राज यांनी देखील केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'