The Kapil Sharma Show- बंद होणार ‘द कपिल शर्मा शो’

kapil-sharma-show
मुंबई – ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच बंद होणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे कारण सोनी चॅनल आता कपिल शर्मासोबत काँन्ट्रक्ट रिन्यू करण्याच्या मूडमध्ये नाही. वारंवार खाली जाणारा टीआरपी आणि कपिल शर्माची खराब तब्येत हे दोन कारणे यामागे असल्याचे सांगितले जात आहे. सोनी चॅनलचे कपिलसोबत असलेले काँट्रॅक्ट एप्रिलमध्ये पूर्ण झाले आहे आणि आता चॅनल आणि कपिलमध्ये कोणत्याच प्रकारचा करार झालेला नाही. आतापर्यन्त तीन वेळा सेटवर कपिल आजारी पडला आहे.
            मागील एक-दीड महिन्यापासून कपिल वारंवार सेटवर चक्कर येऊन पडत असे. त्यामुळे प्रमोशनमुळे आलेल्या अनेक कलाकारांना प्रमोशन न करताच परतावे लागले होते. अनिल कपूर ‘मुबारका’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इतर कलाकारांसोबत पोहोचले होते. पण कपिल शर्माची तब्येत खराब असल्याने या सर्वांना शूटिंग न करताच निघावे लागले. याअगोदर ‘हॅरी मेट सेजल’ प्रमोट करण्यासाठी गेलेले शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा तसेच ‘गेस्ट इन लंडन’चे प्रमोशन करण्यासाठी गेलेले परेश रावलही शूटिंग न करताच परतले होते. कपिल त्याच्या आगामी चित्रपट ‘फिरंगी’ च्या सेटवरही अनेकदा बेशुद्ध पडला आहे.
सुनील ग्रोवर, अली असगर, सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांनी हा शो सोडल्यामुळे टीआरपी फार खाली घसरला आहे.