कपिल शर्मा करतोय घरी येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी

टीम महाराष्ट्र देशा : कपिल शर्मा लवकरच वडील होणार आहे. ही गोड बातमी कपिलने दिली आहे. लवकरच कपिलच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. कपिल म्हणाला, कुटुंबामध्ये नवीन पाहुणा येणार मला खूप आनंद होत आहे. नवीन पाहुण्याची मला खूप आतुरता आहे.

गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये गिनी चतरथ सोबत कपिल शर्माचा विवाह झाला होता. तसेच गिनी चतरथ आणि कपिल शर्माच हे खूप वर्षापासून रिलेशनशिप मध्ये होते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना कपिलने नवीन पाहुण्यासाठी करत असलेली तयारी सांगितली.

‘खर सांगू, मला काही समजत नाही की मी काय तयारी करू आणि कशी करू. मला या वेळेस काही अनुभव नाही. पण माझं संपूर्ण कुटुंब खूप आतुरतेने चिमुकल्या पाहुण्याची वाट बघत आहे. तसेच पुढे बोलताना कपिल म्हणाला, मी आणि माझी पत्नी नवीन पाहुण्यासाठी खरेदी करत आहोत. परंतु आम्हांला माहित नाही मुलगा आहे की मुलगी त्यामुळे आम्ही सामान्य वस्तू खरेदी करत आहोत.

तसेच कपिल म्हणाला, जेव्हा माझे लग्न झाले नव्हते तेव्हा घरी गेल्यावर मला खूप एकटे वाटायचे पण आता माझे लग्न झाले आहे. तसेच माझी आई देखील आता आमच्या सोबत वेळ घालवत आहे.