fbpx

कपिल पाटलांची हॅट्ट्रिक, पुण्यात समाजवादी महाराष्ट्रासाठी संकल्प मेळावा

kapil patil

pune :  आमदार कपिल पाटील यांच्या विजयाची हॅट्ट्रिक साजरी करण्यासाठी पुण्यात शनिवारी 15 जुलैला साने गुरुजी स्मारकात समाजवादी महाराष्ट्रासाठी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. झुंजार शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यावेळी प्रमुख वक्तेे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात आमदार कपिल पाटील यांचा डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. या मेळाव्याचे अध्यक्ष राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार हे असतील.

मेळाव्याला राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी परिवारातील विविध क्षेत्रात काम करणारे राज्यभरातील नेते, कार्यकर्ते येणार आहेत. राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त न्या. प्रकाश परांजपे, डॉ. अभिजित वैद्य, लोकतांत्रिक जनता दलाच्या राष्ट्रीय महासचिव सुशीलताई मोराळे, सुभाष वारे, अतुल देशमुख, जनता दलाचे प्रभाकर नारकर , राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष अलाउद्दीन शेख हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सकाळी 10.30 ते दुपारी 2 यावेळेत हा मेळावा साने गुरुजी स्मारकाच्या राष्ट्र सेवा दल सभागृहात होणार आहे,अशी माहिती निमंत्रक ऍड, जाकीर अत्तार ,कुलदीप अांबेकर,राकेश नेवासकर,प्रमोद दिवेकर,निलेश निंबाळकर,फैय्याज ईमानदार यांनी दिली आहे.आमदार कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदार संघात विजयाची नुकतीच हॅट्ट्रिक केल्याने राज्यभर समाजवादी परिवारात उत्साहाचे वातावरण आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने समाजवादी चळवळीची पुढची वाटचाल आणि लढाईचा नवा अजेंडा यावर विचारमंथन होऊन पुढची दिशा ठरणार आहे.

येत्या वर्षभरात एसटीच्या स्लीपर बस येणार

अजय देवगन आणि काजोल तब्बल 8 वर्षांनंतर दिसणार एकत्र