महाविद्यालयात गीता वाटपाच्या मुद्द्यावरून आ.कपिल पाटील आक्रमक

नागपूर : महाविद्यालयात भगवत गीता देण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. नॅकचे A आणि A+ चे नामांकन असलेल्या मुंबईतील महाविद्यालयात भगवत गीतेचे वाटप करावेत असा आदेश उच्च शिक्षण विभागाने काढला आहे. उच्च शिक्षित असलेल्या तावडे यांना आणि त्यांच्या सरकार हिंदुत्ववादी धोरण राबवायचे आहे ते यावरून स्पष्ट होत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.दरम्यान जर धर्माचा प्रसार करायचाच असेल तर मग सर्व धर्मांचे ग्रंथ वाटले पाहिजेत अशी उपरोधात्मक मागणी आ.कपिल पाटील यांनी केली आहे.

परिपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, नॅक मुल्यांकन झालेल्या अ/अ+ श्रेणी प्राप्त मुंबई आणि मुंबई उपनगरांमधील १०० महाविद्यालयांमध्ये भगवदगीतेचं वाटप केलं जाणार आहे. यासाठी प्राचार्यांना भगवदगीतेच्या १०० संचाचे वाटप करण्याचा आदेश देण्यात आला आहे.फक्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये भगवदगीता वाटली जाणार आहे. उच्च शिक्षण विभागाने यासंबंधी परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान या निर्णयामुळे नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी टीकेला सुरुवात केली आहे.

जर धर्माचा प्रसार करायचाच असेल तर मग सर्व धर्मांचे ग्रंथ वाटले पाहिजेत अशी उपरोधात्मक मागणी आ.कपिल पाटील यांनी केली आहे. ‘जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे तिथे हा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रात आतापर्यंत होत नव्हतं, पण आता इथेही सुरु होतंय असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजप प्रगत महाराष्ट्राला अधोगतीकडे घेवून जाण्याचे काम करत आहे – विखे पाटील

 

You might also like
Comments
Loading...