कपिल देव यांनी साधला हार्दिकवर निशाणा; म्हणाले…

कपिल देव यांनी साधला हार्दिकवर निशाणा; म्हणाले…

Kapil Dev

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव(Kapil Dev) यांनी अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) च्या फिटनेसवर आता प्रश्न उपस्थित केले आहेत. हार्दिकने त्याच्या फिटनेसशी संबंधित अनेक मुद्दे उघड न केल्याने कपिल देव यांनी त्याच्यावर टीका केली आहे. हार्दिकला त्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून वगळण्यात आले होते.

पांड्याच्या फिटनेसवर बाबत आता प्रश्न उपस्थित होत असतना कपिल देव यांनी हार्दिक पांड्यावर निशाणा साधत त्याला अष्टपैलू म्हणता येईल का यावर देखील आपलं मत दिले आहे. रॉयल कलकत्ता गोल्फ कोर्समध्ये बोलत असताना कपिल देव म्हणाले, ‘पंड्याला अष्टपैलू म्हणायचे असेल तर त्याला दोन्ही करावे लागेल. तो गोलंदाजी करत नसेल तर त्याला अष्टपैलू म्हणायचे का? तो दुखापतीतून सावरला आहे, त्यामुळे त्याला प्रथम गोलंदाजी करू द्या. हार्दिक भारतासाठी खूप महत्त्वाचा फलंदाज आहे. गोलंदाजी आणि चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला बरेच सामने खेळावे लागतात. तरच आपण त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणू शकतो.’

‘राहुल द्रविड हा क्रिकेटपटू म्हणून जितका यशस्वी आहे, त्यापेक्षा तो प्रशिक्षक म्हणून अधिक यशस्वी होईल, असेही कपिल यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘तो एक चांगला माणूस आहे आणि एक चांगला क्रिकेटरही आहे. तो क्रिकेटपटू म्हणून जितका यशस्वी आहे, त्यापेक्षाही तो प्रशिक्षक म्हणून यशस्वी होईल.

कपिल यांना त्यांच्या आवडत्या अष्टपैलू खेळाडूबद्दल विचारले असता, त्यांनी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाचे नाव घेतले. ते म्हणाला, ‘आजकाल मी फक्त क्रिकेट एन्जॉय करायला जातो. ते माझे काम आहे. मला तुमच्या दृष्टिकोनातून दिसत नाही. मी अश्विनचे ​​नाव घेईन. तो छान आहे. जडेजा हा सुद्धा महान क्रिकेटर आहे. पण त्याची फलंदाजी सुधारली आहे आणि गोलंदाजी खराब झाली आहे.

महत्वाच्या बातम्या