कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयांवर कपिल देव यांचा संताप

टीम महाराष्ट्र देशा – न्यूझीलंड संघानं भारतावर पहिल्या कसोटीत दहा विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद करताना मालिकेत १-०  अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांचा किवी गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. टीम साऊदी, कायले जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट या त्रिकुटानं तर टीम इंडियाची दाणादाण उडवली.

या पराभवामुळे सध्याच्या घडीला भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. एक तर त्यांची पराभवाची मालिका संपताना दिसत नाही. वनडे मालिकेनंतर आता पहिला कसोटी सामनाही त्यांना गमवावा लागला. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीचा फॉर्मही चांगला नाही.

त्यात दुसऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंडच्या ताफ्यात प्रभावी मारा करणारा नील वॅगनर दाखल झाला आहे. 29 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला रोखण्यासाठी खास ‘मास्टर प्लान’ तयार केला आहे. तर टीम इंडिया मालिका वाचवण्याचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून २९ फेब्रुवारीला मैदानावर उतरणार आहे.

दुसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंडच्या संघात नील वॅगनरचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत वॅगनरने त्याच्या भेदक व आखूड माऱ्यानं वर्चस्व गाजवले होते. आता तो टीम इंडियाच्या फलंदाजांना सतावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यानं आतापर्यंत ४७ कसोटी सामन्यांत २६.६३ च्या सरासरीनं २०४ विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यानं तीन सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आता टीम इंडियाचीही डोकेदुखी वाढणार आहे.

आता भारताचे माजी कर्णधार कपिल देव कोहली आणि संघ व्यवस्थापनावर चांगलेच भडकलेले दिसत आहेत. यावेळी कपिल म्हणाले की, ‘भारतीय संघाचं नेमकं काय चाललंय? कारण जवळपास प्रत्येक संघात संघामध्ये बदल पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जे खेळाडू फॉर्मात आहेत त्यांना संधी मिळायला हवी. आता लोकेश राहुल हा चांगल्या फॉर्मात आहे, पण त्याला संघात स्थान का देण्यात येत नाही. या साऱ्या गोष्टी अनाकलनीय आहे.’

हेही पहा –

https://www.youtube.com/watch?v=x1OMSDr8zqk