रणवीर सिंघच्या अभिनयाने कपिल देव झाले थक्क, म्हणाले…

blank

टीम महाराष्ट्र देशा : दिग्गज अष्टपैलू कपिल देव यांनी ‘’83’ चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगचे कौतुक केले आहे. रणवीर सिंगने वठवलेल्या नटराज शॉटचे पोस्टर पाहून कपिल देव थक्क झाले आहेत. नटराज शॉट हा कपिल देव यांचा ट्रेडमार्क शॉट मानला जातो.

कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघात 1983 च्या ऐतिहासिक विजयावर आधारित ”83” हा चित्रपट येत आहे. भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयावर बनलेल्या या चित्रपटात रणवीरने पुन्हा कापिल देव यांचा हा शॉट खेळला आहे. सोमवारी रणवीरने सोशल मीडियावर नटराज शॉट खेळत असताना त्याचा फोटो शेअर केला होता. यावर कपिल देव यांनी री ट्विट करत कौतुक केले आहे. “हैट्स ऑफ रणवीर.” असे कपिल देव यांनी म्हंटल आहे.

83 हा सिनेमा १० एप्रिल २०२०ला प्रक्षेकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सिनेमाला अधिकृत तारीख मिळालेली नाही. या सिनेमात रणवीर सिंग हा कपिल देवच्या मुख्य भूमिकेत आहे. तर कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका दीपिका पदुकोण करत आहे. त्यामुळे कपिल देव यांच्या मुख्य भूमिकेतील रणवीर सिंग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. तर रणवीर सिंगने ट्विट केलेल्या फोटोचे चांगलेचं कौतुक केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या