भारतीच्या अटकेनंतर ट्रोल होतोय कपिल, ‘द कपिल शर्मा शो’ बॉयकॉट करण्याची मागणी 

kapul and bharti

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहला ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने अटक केल्यानंतर टीव्ही विश्वात मोठी खळबळ माजली आहे. एकीकडे भारतीच्या अटकेबाबत चाहते धक्क्यामध्ये आहेत तर दुसरीकडे कपिल शर्मा याचं नाव देखील सोशल मीडियावर ट्रेंड होतं आहे. कपिल शर्माला एनसीबीच्या या कारवाईनंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये दोघांनीही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे कबुल केले आहे. यानंतर भारती ट्विटरवर ट्रेंड होत होती, पण तिच्याबरोबर आणि एक नाव ट्रेंड होत होतं आणि ते म्हणजे कपिल शर्मा. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात भारती आणि कपिल एकत्र काम करतात. याचमुळे कपिल शर्मा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. कपिल शर्माचा कॉमेडी शो बॉयकॉट करण्याची मागणी देखील सोशल मीडियावर केली जात आहे.

गेल्या 2 आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाड सत्र सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. आता ड्रग प्रकरणात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह हिच्या अटकेनअतंर आता तिचा पती हर्ष लिंबाचिया याला देखील एनसीबीने (NCB) अटक केली आहे.

शनिवारी भारतीला अटक करण्यात आली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून हर्ष लिंबाचिया याची जवळपास 18 तास चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे. एनसीबी अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. आज भारती आणि हर्ष दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये दोघांनीही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे कबुल केले आहे.

महत्वाच्या बातम्या