#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट

मुंबई : बॉलिवूड गायिका कनिका कपूरच्या अडचणीत वाढ झाली आहे. कनिकाचा कोरोनाचा चौथा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. कनिका कपूर काही दिवसांपूर्वीच लंडन मधून भारतात आली होती. त्यानंतर तिने अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. मात्र कनिकाला काही दिवसांनी करोनाच्या संसर्गाचा त्रास होण्यास सुरवात झाली. त्यानंतर तिला कोरोना झाला असल्याचं समोर आलं.

कनिका कपूरने आपल्या इंस्टा अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. तसेच तिने ‘वेळ’ असा एक वॉलपेपर टाकत त्याखाली एक मेसेज लिहिला आहे. तिने लिहिले आहे की, मी विश्रांती घेत आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मझ्या सोबत आहेतच. तुम्ही पण सुरक्षित राहा. काळजी घ्या. मी ठीक आहे. ICUमध्ये वगैरे नाही. मला आशा आहे पुढचा अहवाल हा नकारात्मक असेल. मी माझा कुटुंबियांना खूप मिस करत आहे.

दरम्यान कनिका कपूरला कोरनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण देशात आणि बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. कनिकाच्या पॉझिटिव्ह अहवालानंतर तिच्या संपर्कात आलेल्या अनेक दिग्गज नेत्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले होते. विशेष म्हणजे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही स्वत:ची टेस्ट केली. पण त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले.