आता कन्हैया कुमार शनिवारवाड्यावर !

कन्हैया कुमार

पुणे   : जिग्नेश मेवानी, उमर खालिद यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी शनिवार वाड्यावर वादग्रस्त कार्यक्रम झाल्यानंतर आता जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांच्या उपस्थितीत येत्या 28 जानेवारीला शनिवारवाड्यावर सावधान परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी दिली.

कोरेगाव भीमासह लगतच्या पाच गावांमध्ये घडलेल्या दगडफेक व जाळपोळीच्या पार्श्‍वभूमीवर मातंग समाजातील विविध संघटनांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत जातीयवादी व धर्मांध शक्तीविरोधी लढण्यासाठी मातंग समाजाने एकत्र येण्याचे ठरले आहे. मातंग समाजाला जागृत करण्यासाठी सावधान परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.