कन्हैया कुमार आणि शहला रशीद लढवणार लोकसभा निवडणूक ?

नवी दिल्ली: दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाचे विद्यार्थी शहला रशीद आणि कन्हैया कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. या दोघांनी भाजपला विरोध केला आहे. कन्हैया कुमार यांनी नेहमी भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कन्हैया कुमार हा जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता असून शहला रशीद ही जेएनयूतील पीएचडीची विद्यार्थीनी असून ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनची उपाध्यक्ष होती.

भाजपाविरोधात सामाजिक-राजकीय तसेच पुरोगामी विराचांच्या संघटनांना एकत्र आणण्याचे काम आम्ही करणार आहेत. तसेच आपण यामध्ये विजयी होऊ असा विश्वास व्यक्त करताना शहला आणि कन्हैया यांनी गुजरातचे दलित आमदार जिग्नेश मेवाणी यांना मिळालेल्या यशाचा दाखला दिला आहे.

“यापूर्वी मी निवडणूक कार्यालयाचे कामकाज सांभाळले आहे. सध्यातरी ती निवडणूक लढवण्यास तयार नाही. मात्र, सर्व गोष्टी सर्वसाधारण असतील आणि अशात जर तीने एखाद्या ठिकाणाहून निवडणूक लढवावी अशी परिस्थिती निर्माण झाली तर ती नक्कीच निवडणूकीच्या रिंगणात उतरेन. मी कधीही कुठलाही पक्ष किंवा मतदारसंघाची अद्याप निवड केलेली नाही” असे शहला रशीद म्हणाल्या.

You might also like
Comments
Loading...