टी-२० मालिका गमवाल्यानंतर कांगारुचे दमदार पुनरागमन; १३३ धावांनी उडवला विंडीजचा धुव्वा

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने १३३ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संपुर्ण डाव १२३ धावांवर अटोपला. यासह एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाने १-० अशी आघाडी घेतली आहे.

पावसामुळे षटकाची संख्या ४९ केलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने निर्धारीत ४९ षटकात ९ गडी गमावत २५२ धावांची मजल मारली. कर्णधार अॅलेक्स कॅरीने ऑस्ट्रेलियाकडून ८७ चेंडुत ५ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधीक ६७ धावांची अर्धशतकी खेळी केली. वेस्ट इंडिजकडून हेडन वॉल्शने सर्वाधीक ५ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संपुर्ण संघ २७व्या षटकांत अवघ्या १२३ धावांवर बाद झाला. यासह ऑस्ट्रेलियाने पहिला एकदिवसीय सामना १३३ धावांनी जिंकला. कर्णधार कायरान पोलार्डने ५७ चेंडुत ५ चौकार आणि ३ षटकारासंह सर्वाधीक ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र विंडीजचे इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधीक ५ गडी बाद केले. त्यालाच सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP