भारताकडून कांगारूंचा पुन्हा पराभव

टीम महाराष्ट्र देशा : मेलबर्न येथे सुरु असलेल्या भारत – ऑस्ट्रेलिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने सामना ७ गडी राखून जिंकला असून एकदिवसीय सामन्यांची मालिका देखील आपल्याचं खिश्यात घातली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली व ऑस्ट्रेलियाला अवघ्या २३० धावांवर रोखले. त्यानंतर भारताने कोहली , धोनी आणि केदारच्या संयमी खेळीने हा सामना दिमाखात जिंकला आहे.

या सामन्यात धोनीने ११४ चेंडू मध्ये ८७ धावा केल्या तर केदार जाधवने ५७ चेंडू मध्ये ६१ धावा केल्या आहेत. तसेच विराट कोहलीने ने देखील ४६ धावा केल्या. पण या सामन्याचा खरा हिरो मात्र युजेन्द्र चहल ठरला आहे.कारण आपल्या १० ओव्हरस मध्ये चहलने ४२ धावा देऊन ऑस्ट्रेलियाचे तब्बल ६ गडी बाद केले आहेत.