मुंबई : महेश बाबू याने बॉलिवूडबद्दल एक वक्तव्य केले होते. सध्या महेश बाबूचं हे वक्तव्य सगळीकडे चर्चेचा विषय बनलं आहे. याची सोशल मिडीयावर बरीच चर्चा केली जात आहे. मी बॉलिवूडला परवडणार नाही त्यामुळे हिंदी चित्रपटांवर मी वेळ वाया घालवणार नाही.” असं महेश बाबूनं म्हटलं होतं. यावर बॉलिवूड मध्ये खळबळ माजली होती. या गोष्टीला काही सेलिब्रेटींनी अप्रत्यक्षपणे पाठींबा दिला तर काहींनी त्यावर टीका देखील केली. आता कंगना रणौत हिने महेश बाबूच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने महेश बाबूचं कौतुक केल आणि त्याला स्पष्ट पाठींबा दिला.
आगामी चित्रपट ‘सरकारू वारू पाटा’ याच्या प्रमोशनच्या वेळी मुलाखातीमध्ये महेश बाबूला एक प्रश्न विचारण्यात आला, तू हिंदी चित्रपटांमध्ये कधी काम करणार? यावर उत्तर देताना महेश बाबू म्हणाला, मला माझा वेळ वाया घालवायचा नाही. मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी मला खूप प्रेम आणि आदर मिळाला आहे.
महेश बाबूच्या या वक्तव्यावर कंगना रणौतनं एका मुलाखतीती भाष्य करताना या वक्तव्यावर सहमती दर्शवली आहे. तो जे काही बोलला आहे ते खर बोलला आहे. तो बॉलीवूडला परवडणारच नाही, असं कंगनाने म्हंटल आहे. कंगना पुढे म्हणाली, “त्याने त्याच्या इंडस्ट्रीसाठी आदर दाखवला आहे. ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. या गोष्टी त्च्यायाकडून शिकायला हव्यात.
महत्वाच्या बातम्या :