कंगनाची वाचा घसरली, उर्मिला मातोंडकरला म्हणाली अश्लील चित्रपटात…

Kangana vs urmila

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने सुशांत राजपूत प्रकरणी बॉलिवूडमधील नेपोटीजमसह मुंबई पोलीस आणि व्यवस्थेबद्दल आवाज उठवल्यानंतर मोठा वादंग सुरु झाला आहे. आधी कंगना विरुद्ध बॉलिवूड मधील नेपोटीजम स्टार यांच्यासोबत असलेला हा वाद संजय राऊत, शिवसेना ते थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्राच्या अस्मितेपर्यंत जाऊन पोहोचला होता.

हा वाद सुरु असतानाच २ दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने देखील कंगनावर निशाणा साधत या प्रकरणात उडी घेतली. ” मुंबईने कंगनाला पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा सगळं काही मिळवून दिले. इंडस्ट्रीने तिला भरभरून दिले त्याच इंडस्ट्रीला ती दिवसभर शिव्या देते. काही निवडक लोकांमुळे अख्खी इंडस्ट्री कशी वाईट असू शकते. कंगणा जे काही बडबडते ते कोणत्याही नॉर्मल व्यक्तीला पटण्यासारखे नाहीत. आपल्याला ठरवायचे असते की कशा पद्धतीने बोलले जावे.” असा घणाघात साधला होता.

यावर कंगनाने देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रत्युत्तर देत काही अश्लील शब्द देखील वापरले. ”  कोणत्याही पक्षाच्या तिकिट वा प्रसिद्धीसाठी केलं नसून माझं ऑफिस वा जीव या साठी पणाला लावायची मला गरज नाही. तसेच ज्या उर्मिलाने माझ्यावर टीका केली ती स्वतः खालच्या प्रतीच्या अश्लील चित्रपटांची स्टार आहे” अशी टीका कंगनाने केल्यानंतर आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

महत्वाच्या बातम्या