fbpx

कंगणाचा ‘मेंटल है क्या’ होणार ‘या’ दिवशी रिलीज

टीम महाराष्ट्र देशा : कंगना आता तिच्या आगामी चित्रपट ‘मेंटल है क्या’ साठी तयार आहे. राजकुमार रावसह कंगणा या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात कंगणानाची भूमिका मानसिक रुग्णाची असणार आहे. या भूमिकेमुळे कंगणाचं वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा राजकुमार आणि कंगना यांच्या जीवनावर आधारित आहे.

‘मेंटल है क्या’ या चित्रपटाचा ट्रेलर १९ जून रोजी रिलीज होत असून, २१ जूनला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. कंगनाचा हा नवाकोरा चित्रपट किती कमाई करणार याकडे लक्ष लागले आहे.