कंगणाचा ‘लडाकू नंबर वन’ अंदाज, शेअर केले ‘धाकड’ सिनेमाच्या सेटवरील फोटो

कंगना रणौत

मुंबई :  अभिनेत्री कंगना रनौत सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती बऱ्याचदा अडचणीत आली आहे. यामुळे तीची नेहमीच चर्चा होत असते. आता तिच्या ‘धाकड’ या तिच्या आगामी सिनेमामुळे तिची चर्चा होत आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टास्टोरीला ‘धाकड’ सिनेमाचा एका बीटीएस व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कंगना अ‍ॅक्शन सीनसाठी ट्रेनिंग घेताना दिसते आहे. यात ती दोन व्यक्तींसोबत फायटिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये कंगनाने लिहिलं आहे. “लडाकू नंबर वन” असे तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.  या सिनेमात कंगनाचा दमदार अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘धाडक’ सिनेमा एक अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमा असून या सिनेमात कंगना अर्जुन रामपालसोबत झळकणार आहे.

kangna-dhakad-bts-video

काही दिवसापूर्वीच फोटो शेअर करत अर्जुनने एक खास संदेश लिहिला होता. तो म्हणाला, टीम तसेच इतर सहकारी यांच्यासोबत मी घेतलेल्या आठवणी खास आहेत. सॉरी कारण कंगना रानौतचा फोटो पाहायला मिळत नाही. कारण तिचा लूक दिसत नव्हता. माझ्या व्यक्तीरेखेचा फोटो अजून शेअर करू शकलो नाही. तुमच्यासोबत काम करणे आश्चर्यकारक होते. कंगना रनौतच्या भुमिकेचा लोकांवर एक वेगळा प्रभाव पडलेला यात पहायला मिळेल, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होते.

कंगनाचा बहुप्रतिक्षित ‘थलायवी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण कोरोनात वाढ झाल्यामुळे कंगनाचा हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही. तसेच कंगना तेजस या चित्रपटात देखील दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या