राजकारणात येण्याबाबत कंगणाचा मोठा खुलासा, म्हणाली…

kangnaa rnavat

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘थलायवी’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. कंगनाचा थलायवी चित्रपट 10 सप्टेंबर रोजी चित्रपट गृहात रिलीज झाला आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देखील दिला आहे. याबाबत कंगनाने पत्रकार पत्रकारपरिषदे घेत हॉलिवूड सिनेमांवर निशाणा साधला आहे. यावेळी तिने हॉलिवूड सिनेमांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. तसेच राजकारणात येण्याबाबत खुलासा केला आहे.

या पत्रकार परिषदे दरम्यान, बॉलिवूड आणि प्रादेशिक सिनेमांना प्रोत्साहन देण्याची गरज तिनं यावेळी व्यक्त केली’आत्मनिर्भर’ होण्यासाठी आपल्याला आपल्या लोकांना आणि आपल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अमेरिकन आणि इंग्रजी चित्रपट भारतात प्रदर्शित होतात आणि या चित्रपटांमुळे आपल्या चित्रपटांना कमी स्क्रिन मिळतात. हॉलिवूडने आधीच फ्रेंच, इटालियन, जर्मन आणि अशा अनेक फिल्म इंडस्ट्रीची वाट लावली.

आपण लॉयन किंग व जंगल बुकच डब्ड व्हर्जन पाहतो. पण आपल्याच मल्याळम चित्रपटांचा डब्ड व्हर्जन आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्याला आधी आपले चित्रपट बघायला हवेत. मग ते मल्याळम, तामिळ, तेलगू, पंजाबी अशा प्रादेशिक भाषेतील का असू देत. आपण आपल्या लोकांचे सिनेमे प्राध्यान्यानं पाहायला हवेत.असे केले तरच आपण आत्मनिर्भर भारत घडवू शकू,’ असं कंगना यावेळी म्हणाली.

दरम्यान, यावेळी लोकांची इच्छा असेल तर मी नक्कीच राजकारणात येईल असे देखील म्हंटली आहे. कंगना सध्या अनेक मुद्यांवर आपले परखड मत मांडत असल्याचे दिसत आहे. अनेकदा या कारणांमुळे तिच्या अडचणीत वाढ झाल्याचे देखील दिसले आहे. यावरूनच अनेकदा कंगना राजकारणात येणार असल्याचे देखील चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :