करीनाच्या जागी आता कंगना साकारणार सीतेची भूमिका

kangnaa rnavat

मुंबई : मागील काही दिवसापासून ‘The Incarnation- SITA’ या चित्रपटामधील सीतेच्या भुमिकेबाबत बरीच चर्चा रंगली होती. सुरवातील हि भूमिका बॉलिवूडची बेबो करीना कपूर करणार असलेल्याचे सांगण्यात आले. मात्र या भूमिकेसाठी १२ कोटी रुपये मानधन मागितले असल्याने तिला सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. त्यानंतर आता या चित्रपटातील सीतामातेची भूमिका बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत साकारणार असल्याचे समोर येत आहे.

कंगनाने या चित्रपटाचे पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत ‘The Incarnation- Sita’ या चित्रपटात काम करायला मिळत असल्याने आनंद झाला आहे. सीता राम यांच्या आशीर्वादाने…जय सियाराम’, असे कॅप्शन कंगनाने दिले आहे.

चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या एसएस स्टुडिओच्या निर्मात्या सलोनी शर्मा यांनी म्हटले आहे की, ‘एक स्त्री म्हणून कंगनाचे स्वागत करण्यात मला खूप आनंद होतं आहे. ‘The Incarnation Sita’ या चित्रपटात कंगना एक भारतीय महिला किती निर्भयी असते याची प्रमिता साकारणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

दरम्यान, नुकताच रिलीज झालेला कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी जादू दाखवू शकला नाही. कंगनाने या चित्रपटात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकरली होती. त्यानंतर आता लवकरच ती सीतामातेच्या भूमिकेत दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या