मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. मंगळवारी सकाळी अशी माहिती मिळाली की, उद्धव ठाकरे सरकारच्या १३ बंडखोर आमदारांनी गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील आहेत. याची माहिती मिळताच महाराष्ट्र सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. आता या पार्शवभूमीवर कंगना रणौतचा (Kangana Ranaut) सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे.
२०२० मध्ये कंगना रणौतने उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackeray) एक वक्तव्य केले होते. तेच वक्तव्य आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. कंगनाच मुंबईमधील ऑफिस महानगरपालिकेकडून उध्वस्त केल्यानंतर तिने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. सध्या तोच व्हिडीओ परत एकदा चर्चेत आला आहे.
Once #KanganaRanaut said
"Today my house is broken..
Tomorrow your pride will break!!!"#UddhavSarkarOnEdge#UddhavThackeray
pic.twitter.com/3YOiGfNVcs— ★ɬąཞą★ (@tariishh) June 22, 2022
या व्हिडीओमध्ये कंगना म्हणाली होती, “उद्धव ठाकरे तुम्ही माझ्याकडून बदला घेतला असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्ही आज माझं घर तोडलं आहे, उद्या तुमचा गर्व तुटणार हे नक्की. वेळ नेहमीच एकसारखी नसते हे लक्षात ठेवा.” याच्या आता सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहेत.
Those words by #KanganaRanaut 🔥#MahaVikasAghadi #UddhavThackeray #ShivsenaMLA #BJP4Maharashtra pic.twitter.com/UslDlfwOtL
— Himalaya 🇮🇳 (@Himalaya_72) June 22, 2022
महत्वाच्या बातम्या :