कंगना रनौत उतरणार राजकारणाच्या मैदानात?; ट्विटरवरून दिले संकेत

kangan

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत कोणालाही लक्ष्य करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. कंगना नेत्यांपासून ते बॉलिवूड सेलेब्रिटीपर्यंत सर्वांनाच वेठीस धरते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि राज्य सरकार यांच्यात झालेला वाद हा चांगलाच पेटला होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगणारे मुंबई पोलिसांच्या तपासासह राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. यानंतर हा वाद शिवसेना विरुद्ध कंगना असा झाला होता.

दरम्यान कंगनाने राजकारणात एन्ट्री करण्याचे संकेत दिले आहेत. तिने या संदर्भात एक ट्विट करून सर्वांना गोंधळात टाकलं आहे. माझं फक्त चित्रपटांवर प्रेम आहे. पण सध्याची स्थिती पाहता मी कदाचीत…. असं म्हणत कंगनाने राजकारणात सक्रिय होण्याचा इशारा दिला आहे.

कंगना ट्विट करत म्हणाली, ‘नवा दिवस, नवी केस…अनेक राजकारणी पक्ष माझ्यावर गुंतवणूक करण्यास तयार आहेत, जसं मी एक नेता आहे. प्रत्येक दिवशी मला एका राजकारणी व्यक्ती प्रमाणे घेतलं जातं. न्यायालयीन खटले, विरोधी पक्षांचा सामना.. परंतू माझ्याकडे समर्थन नाही. माझं फक्त चित्रपटांवर प्रेम आहे. पण सध्याची स्थिती पाहता मी कदाचीत….’ असं ट्विट कंगनाने केले आहे. यावरूनच चर्चेला उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या