मुंबई : कंगना राणौत ही तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. तिच्या या वक्तव्यांमुळे ती नेहमी वादात असते. कंगना राणौत तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या स्वतःच्या वैयक्तिक कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. आता कंगनाने खूप वेगळे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे बॉलिवूडला नक्कीच हादरा बसेल.
अजय देवगण आणि कंगना राणौत यांनी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ हा एकत्र केलेला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. त्यावेळी अजय देवगण आणि कंगना राणौत यांच्यामध्ये रोमान्स सुरु होता.
अजय देवगणने कंगनाला रास्कल आणि तेज सारखे देखील चित्रपट मिळून दिले. असंही म्हंटल जात आहे कि, या चित्रपटासाठी पहिल्यांदा विद्या बालनला ऑफर करण्यात आली होती. पण नंतर अजय देवगणच्या सांगण्यावरून यात कंगनाला भूमिका देण्यात आली. यांच्या नात्यामध्ये एक वेळ अशी आली होती की, कंगना अजयबद्दल खूप पझेसिव्ह आणि इमोशनल होती.
अजय देवगणने दोघांमध्ये अंतर ठेवले आणि ब्रेकअप झाल्याचं देखील सांगितलं. यावरून एका मुलाखतीत कंगना ने सांगितल की, विवाहीत पुरुषासोबत राहून मोठी चूक केली आहे. दोघांच्या अफ़ेअरबद्दल ऐकूण अजय देवगणची पत्नी काजोल देखील त्याच्यावर चांगलीच संतापली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :