लग्नाच्याआधीच कंगना प्रेग्नंट?; फोटो होतोय व्हायरल

कंगना

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या धडाकेबाज वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अनेकदा तिच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाले आहेत. वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी कंगना सध्या एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत  आली आहे.

सध्या कंगनाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोत कंगणाचे वजन वाढलेले दिसतंय. पोटही प्रेग्नंट असल्याप्रमाणे बाहेर आलंय. कंगणाला पाहून ती प्रेग्नंट असल्याचे चाहत्यांना वाटतंय. अनेकांनी हा फोटो पाहून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा रंगत आहे. वारंवार तिचा हा फोटो पाहिला जात आहे. यावेळी मात्र कंगणाला पाहून चाहत्यांनाही मोठा धक्काच बसला आहे. तिचा हा लूक आगामी सिनेमातील असल्याची चर्चा देखील होत आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिचा बहुप्रतिक्षित ‘थलावी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण कोरोनात वाढ झाल्यामुळे कंगनाचा हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही. ‘थलावी’ २३ एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तसेच कंगना तेजस, धाकड चित्रपटात देखील दिसणार आहे.

IMP