कंगनाला दिलासा नाहीचं! जावेद अख्तर प्रकरणात होणार कारवाई

कंगनाला दिलासा नाहीचं! जावेद अख्तर प्रकरणात होणार कारवाई

kanagna

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडते. कंगणा तिच्या बेधडक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. कंगना सातत्याने कोणत्या न कोणत्या वादात सापडते. मात्र, या बेधडक बोलण्यामुळेच ती अनेकवेळा अडचणीत सापडली आहे.

दरम्यान, कंगनाने एका मुलाखतीमध्ये जावेद अख्तर याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावरच आक्षेप घेत प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रानावत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. जावेद अख्तर यांनी कंगना रानौत विरोधात अंधेरीच्या न्यायालयात हा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.

यावरच आता न्यायालयाने खटल्याची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई रद्दबातल करण्यासाठी कंगनाने उच्च न्यायालयात याचिका केली असून न्यायालयाने नियमबाह्य पध्दतीने कारवाई केली, असा आरोप याचिकेत केला होता. मात्र, न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली आहे. न्या. डेरे यांनी यावर निकाल जाहीर केला. कंगनाला न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नसून याचिका नामंजूर केली आहे.

अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेली मानहानीच्या खटल्याची कारवाई योग्य आहे असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. यामुळे कंगनाला आता कारवाईला सामोरे जावे लागेल. याप्रकरणी आता अंधेरी न्यायालयात १४ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या