कंगनाने अक्कल ठेवली गहाण? दादासाहेब फाळकेंना म्हणाली…

Kangana ranaut adn dadasaheb phalake

मुंबई : सुशांत राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये एकच हंगामा सुरु झाला आहे. हे प्रकरण टोकाला गेले असून अमली पदार्थांशी अनेक कलाकारांचे संबंध देखील समोर येत आहेत. दुसरीकडे कंगना रनौतने मुंबई पोलीस आणि व्यवस्थेबद्दल आवाज उठवल्यानंतर शिवसेना आणि कंगनाचा वाद विकोपाला गेला आहे.

आता कंगनाने अजून एक वादग्रस्त ट्विट केले असून यानंतर ती चांगलीच ट्रोल झाली आहे. ज्या बॉलिवूडसृष्टीत ती काम करते, ज्याने पैसा-अडका, प्रसिद्धी कमावली त्या सिनेसृष्टीची भारतात निर्मिती करणाऱ्या दादासाहेब फाळकेंचे नाव देखील कंगनाला नीट घेता आलेले नाही. यामुळे सिनेसृष्टीबद्दल नट-नट्याना कितपत माहिती असते यातून दिसून येत आहे.

कंगनाने काय ट्विट केले आहे?

कंगना रनौतने मनीष अग्रवाल यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे. ” इंडस्ट्री फक्त करण जोहर किंवा त्याच्या बापाने नाही बनवली, बाबा साहेब फाळकेंपासून प्रत्येक कलाकार आणि मजदूरांनी बनवली आहे. ज्या फौजीने सीमेचे रक्षण केले, ज्या नेत्यांनी संविधानाचे रक्षण केले आहे, ज्या नागरिकांनी तिकीट खरेदी करून दर्शकाची भूमिका निभावली आहे, इंडस्ट्री करोडो भारतीयांनी बनवली आहे ” असे ट्विट तिने केले आहे. यात कंगनाने दादासाहेब फाळकेंचा उल्लेख बाबा साहेब असा केल्याने नवे वादंग निर्माण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या:-