कंगनाला पासपोर्ट नूतनीकरणासाठी उच्च न्यायालयाने दिला नकार

कंगना

मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या धडाकेबाज वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. अनेकदा तिच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाले आहेत. तिच्या या वक्तव्यामुळे ती कायमच चर्चेत राहिली आहे. मात्र यावेळी ती तिच्या पासपोर्टमुळे चर्चेत आली आहे. पासपोर्ट प्राधिकरणाने कंगनाच्या पासपोर्ट रिन्यूअल करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कंगनाने मुंबई हायकोर्टात पासपोर्ट नूतनीकरणासाठी याचिका दाखल केली होती. मात्र सुनावणी दरम्यान कंगनाला दिलासा मिळाला नाही.

कंगनाला तिच्या ‘धाकड’ सिनेमाच्या शूटिंगसाठी हंगेरी या देशात जायचं आहे. मात्र कंगनाचा पासपोर्ट १५ सप्टेंबरपर्यंतच वैध असल्याने तिला पासपोर्टचं तातडीने नूतनीकरण करणं गरजेचं आहे. अन्यथा कंगनाला परदेशवारी करण्यात मर्यादा येऊ शकतात. यासाठीच कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली आणि सुनावणी दरम्यान न्यायालयाने कंगनाला पुन्हा नवी याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. तर सुनावणी २५ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने काही आक्षेप नोंदवले आहेत.

कंगनाने वकील रिजवान सिद्दीकी यांच्या मार्फत याचिका दाखल केलीय. यात ‘कंगनाला १५ जून ते १० ऑगस्ट या काळात बूडापेस्ट आणि हंगेरीमध्ये प्रवास करायाचा आहे. ‘धाकड’ सिनेमाच्या दुसऱ्या शेड्यूलचं शूटिंग बाकी आहे’. यासाठी कंगनाला प्रवास करणं गरजेचे असल्याचं या याचिकेत सांगण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP