fbpx

जनतेला वेठीस धरू नका…परप्रांतीय रिक्षाचालकाला मनसे चा दम

टीम महाराष्ट्र देशा: कांदिवली मध्ये मुजोर परप्रांतीय रीक्षावाल्यांना मनसेने चांगलाच हिसका दाखवला आहे. कांदिवली समता नगर पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर परप्रांतीय रिक्षाचालक प्रवाशांकडून तिप्पट भाडे वसूल करतात अशी बोंब नेहमीच होत असते. पण आतापर्यंत या रिक्षावाल्यांवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. काही स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्या नंतर हे प्रकरण मनसेने हातात घेऊन आपल्या स्टाईल ने हाताळले आहे.
मनसेचे चेंबूर येथील नेते नितीन नांदगावकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. फेसबुकवर पोस्ट करत नांदगावकर यांनी या रिक्षावाल्यांना कसा धडा शिकवला आहे हे सांगितलय

नितीन नांदगावकर यांची फेसबुक पोस्ट

३ वाजता कांदिवली समता नगर पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर परप्रांतीय रिक्षाचालक प्रवाशांकडून कशा पद्धतीने तिप्पट भाडे वसूल करतात याचा अनुभव घेण्यासाठी रात्री उशिरा ३ वाजता कांदिवली समता नगर पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर थांबून परप्रांतीय रिक्षाचालक रात्रीच्या वेळी बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची कशी लूटमार करतात आणि भाड्याच्या नावावर दुप्पट तिप्पट भाडे आकारून फसवतात हे गेलो होतो.

दोन दिवसापूर्वीच कांदिवलीला राहणाऱ्या स्थानिक रहिवासी अमिताजींनी रिक्षावाल्यांच्या मुजोरी बद्धल मला तक्रार आणि नाराजी बोलून दाखवली होती म्हणूनच महाराष्ट्र सैनिक म्हणून रात्री ३ वाजता आम्हीं जाऊन बघितले…तावडीत सापडला मुजोर रिक्षाचालक…ट्रेलर दाखवून आलो.

कांदिवली मध्ये परप्रांतीय रिक्षावाल्यांच्या लोंढा मोठया प्रमाणात त्याचाच परिणाम म्हणून त्यांची दादागिरी चालू असते…
पोलीस स्टेशन समोरच जनतेला लुबाडण्यासाठी सर्व रिक्षावाले आतुरलेले असतात.
आज त्यांना समज देऊन आलोय
यापुढे असे होऊ देणार नाही याची महाराष्ट्र सैनिक म्हणून काळजी नक्कीच घेऊ…
अमिताजींना आणि तेथील सर्व नागरिकांना माझा शब्द आहे..

नितीन नांदगावकर यांची फेसबुक पोस्ट

https://www.facebook.com/nitin.nandgaonkar.18/posts/672437403145010