एक निवांत क्षण : कांचन कुल यांनी मारली बैलगाडीतून रपेट

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर कांचन कुल या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आपल्या कुटुंबांबरोबर कांचन कुल यांनी बैलगाडीतून रपेट मारली असून या क्षणांचे काही फोटोज आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केले आहेत. तर या पोस्टमध्ये त्यांनी बैलगाडीच्या स्वारी बाबत काही आशय लिहिला आहे.

‘आजच्या आधुनिक काळात देखील लहान मोठ्या सर्वांना असलेले ‘बैलगाडीच’ आकर्षण काही कमी होत नाही.., कुटुंबासह उन्हाळ्याच्या सुट्टीत बैलगाडीतून एक रपेट मारली त्यावेळचा एक निवांत क्षण’ असे लिहित पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तगडे आव्हान उभे केले होते. मात्र बारामती मतदारसंघाच्या जनेतेने पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्या बाजूनेच कौल दिला.