मुलीच्या उपस्थितीत ४० व्या वर्षी ‘ही’ अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली विवाह बंधनात

मुंबई : टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने बॉयफ्रेंड शलभ डांगशी लग्न केलं. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लग्नाधीच काम्याने तिच्या प्री-वेडींग सेलिब्रेशनचे सगळी धम्माल मस्ती करणारे फोटो चाहत्यांसह शेअर केले होते. लग्नाचे फोटो पाहून चांहत्यांनी त्यांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

तसेच साखरपुड्याला काम्याने क्रीम रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. तर शलभने निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. ९ फेब्रुवारीला काम्याच्या घरी हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. स्वतः काम्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हळदीचे फोटो शेअर केले होते.

Loading...

तसेच सात फेरे घेत तिने आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. लाल रंगाच्या लेंहग्यामध्ये काम्याच पंजाबीचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले होते. तर दुसरीकडे शलभने देखील क्रीम आणि गोल्डन शेरवानी परिधान केली होती. काम्या आणि शलभ एकमेकांना एक वर्षापासून डेट करत आहेत. वर्षभरानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शलभ दिल्लीत राहणारा असून हेल्थकेअर इंडस्ट्रीशी निगडीत आहे.

दरम्यान, काम्या पंजाबीचं हे दुसरं लग्न आहे. याआधी काम्याने व्यावसायिक बंटी नेगीशी लग्न केलं होतं. पण लग्नाच्या १० वर्षांनंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये काम्याने घटस्फोट घेतला. पहिल्या लग्नापासून काम्याला एक मुलगीही आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : भारत कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये, ICMRचा धक्कादायक रिपोर्ट
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी