मावळला मंत्रिपद मिळावे ही माझीही इच्छा – तावडे

कामशेत – मावळ तालुक्‍यातील जनतेने गेल्या तीस वर्षांपासून भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या विस्तारात मावळला संधी मिळावे, ही माझीदेखील इच्छा आहे. त्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांना दिली.

कामशेत येथील वसतिगृहाच्या कार्यक्रमानंतर तावडे यांनी पत्रकांराशी संवाद साधला. या वेळी पत्रकारांनी तावडे यांना विचारले की, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी “बाळा भेगडे यांना विजयी करा. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ,’ असे तुम्ही म्हणाला होतात. त्यावर ते म्हणाले, ‘मंत्रिमंडळाचा विस्तार करताना राज्यातील सर्व भागांतील आमदारांना प्रतिनिधित्व देण्यात आले. त्यात पुणे जिल्ह्यातील तीन आमदार असल्यामुळे दिले गेले नसेल.”

पिंपरी-चिंचवडमधून आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे हेदेखील तीव्र इच्छुक असून, या विस्तारात तिघांपैकी कोणाला संधी मिळेल? या तावडे म्हणाले, “”मंत्रिमंडळात कुणाला संधी द्यायची, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा अधिकार आहे.”

Loading...

मावळवासीयांच्या भावना मुख्यमंत्र्यांना कळविणार
मावळ तालुक्‍यातील भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन बाळा भेगडे यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी केली. त्यावर तुमच्या सर्वांच्या भावना मी आजच मुख्यमंत्र्यांना कळवीन, असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यामुळे दोनवेळा मंत्रिपद हुकल्याने. तिसऱ्या व अंतिम विस्तारात काय होतेय याकडे मावळवासीयांचे लक्ष लागले आहे.