मध्यप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कमलनाथ यांच्या गळ्यात ?

टीम महाराष्ट्र देशा – मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसने सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु केली आहे. पण सध्या काँग्रेससमोर त्याचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न उभा राहिला आहे. मुख्यमंत्री पदासाठी सर्वांत पुढे नाव हे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचे आहे. कमलनाथ यांच्या नावावरच कॉंग्रेस पक्षाकडून शिक्कामोर्तब होईल, अस सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुका कॉंग्रेस पक्षाने कमलनाथ यांच्या नेतृत्वात लढवल्या आहेत. त्यामुळे कमलनाथ हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत.माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचाही कमलनाथ यांना पाठिंबा आहे. सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी कॉंग्रेसला दोन जागा कमी पडल्या आहेत. पण बसपा आणि सपाने पाठिंबा दिला आहे.

वयाच्या ३४ व्या वर्षी पहिल्यांदा छिंदवाडा मतदारसंघातून कमलनाथ खासदार झाले होते. त्यानंतर त्यांनी १९९७ चा अपवाद वगळता ९ वेळा छिंदवाडातून लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले.आजपर्यंत त्यांनी कधीच विधानसभा निवडणूक लढवली नाही. मनमोहन सिंग सरकारमध्ये ते मंत्री देखील होते.

लोकसभा निवडणुकांआधी भाजपला धक्का, आणखीन एका मित्रपक्षाचा रामराम