ज्यांना स्वतःच्या कोल्हापुरात सत्ता आणता आली नाही, त्यांनी सांगलीची स्वप्न पाहू नयेत

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादीचा एक ही नगरसेवक भाजपमध्ये जाणार नाही, ज्या महसुलमंत्र्यांना स्वतःच्या कोल्हापुरात सत्ता आणता आली नाही, त्यांनी सांगली महापालिकेची स्वप्न बघू नयेत असं वक्तव्य राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी केलं आहे. तर निवडणुकीआधीच गिफ्ट देऊन मतदारांना आमिष दाखवण्याचा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील करत आहेत. त्यांनी गिफ्ट वाटण्याचं जे वक्तव्य केले आहे, त्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचही राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सांगली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होणार असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी दर्शवला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर कमलाकर पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. त्यामुळे सांगली महानगरपालिका निवडणुकी आधीच राष्ट्रवादी आणि भाजप मध्ये जोरदार जुंपली आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...