हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बळी – राधाकृष्ण विखे-पाटील

टीम महाराष्ट्र देशा: कमला मिल कम्पाऊंडची भीषण आग हे मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्टाचारच द्योतक आहे त्याचप्रमाणे आगीतील 14 जणांचे मृत्यू हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बळी आहेत असा सनसनाटी आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.

मुंबई शहर भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीच्या तोंडावर असून, आणखी किती मुंबईकरांना आपले प्राण देऊन या अव्यवस्थेची किंमत मोजावी लागेल. अशी विचारणा करत या घटनेची महापालिकेच्या आयुक्तांकडून चौकशी करणे म्हणजे निव्वळ मलमपट्टी ठरेल. या घटनेची आयुक्तांमार्फत होणारी चौकशी आम्हाला मान्य नसून, मागील २ वर्षात मुंबईत इमारत कोसळून आणि आगी लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या सर्वच घटनांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

You might also like
Comments
Loading...