कमला मील आगीची उच्चस्तरीय चौकशी करा- खा. अशोक चव्हाण

 मुंबई: कमला मील कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत अनेकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेला जबाबदार असणा-यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात विविध दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. घटना घडल्यावर सरकार फक्त चौकशीचे आदेश देते, पंरतु ठोस कारवाई होत नाही. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नाहीत. कमला मील कंपाऊंडमध्ये गेल्या काही दिवसांत फार मोठ्या प्रमाणात हॉटेल आणि क्लब सुरु झाले आहेत. त्यातल्या अनेक क्लबमध्ये अनधिकृत बांधकामे असून अनेकांना अग्निशमन विभागाच्या परवानग्या नसल्याचे किंवा नियम डावलून परवानग्या दिल्याची माहिती मिळते आहे. ही अतिशय गंभीर बाब असून महापालिका अधिका-यांच्या वरदहस्ताशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार असणा-या अधिका-यांवरही कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

Loading...

महापालिका अधिकारी आणि हॉटेल व क्लब चालकांच्या भ्रष्ट युतीमुळे मुंबई आणि परिसरात मृत्युचा खेळ सुरु आहे. अशा घटनांसाठी जबाबदार असणा-यांना कडक शासन झाल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना श्रध्दांजली अर्पण करून मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई