कांबळ्या, हे बग मला काय सापडलंय!

blank

टीम महाराष्ट्र देशा : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी सोशल मिडीयावर एक जुना फोटो पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. सचिन तेंडूलकर यांनी त्यांचा शालेय जीवनातील मित्र विनोद कांबळी आणि स्वतः चा एक फोटो पोस्ट केला आहे.

हा फोटो पोस्ट करताना त्यांनी ‘कांबळ्या हा आपल्या शालेय जीवनातील फोटो मला सापडला आहे. हा फोटो शेअर करताना मला जुन्या क्षणांची आठवण झाली अस सचिन तेंडूलकर यांनी म्हटले आहे. तसेच या फोटोला उत्तर देताना विनोद कांबळी यांनी एक किस्सा सांगितला आहे.

त्यावेळी आचरेकर सर माझ्याकडे येताना तू पहिले होत परंतु तू मला सांगितले नाही. त्यानंतर काय झाले हे आपल्या दोघांना माहित आहे, आठवतंय का ? अस कांबळी म्हणाला. याला सचिनने उत्तर देताना कसा विसरू शकतो. आपले खेळायचे दिवस मी खूप मिस करतो. तसेच तू अजून पुढे आला असता तर आपण खूप मस्ती केली असती असंही सचिन म्हणाला.

दरम्यान, शालेय क्रिकेटमध्ये सचिन आणि कांबळी यांच्या नावावर ६६४ रानाच्या भागीदारीचा विक्रम आहे. यात सचिनने नाबाद ३२६ आणि कांबळी याने नाबाद ३४९ धावा केल्या होत्या.

भारताला सापडला नवा लसिथ मलिंगा

शरद पवार मला हसून माफ करतील : सचिन अहिर

धोनी माझं पहिलं प्रेम; महिलेने केला दावा