fbpx

कमलनाथ यांच्या अडचणी वाढल्या,बिहारमध्ये गुन्हा दाखल

पाटणा : उत्तर प्रदेश आणि बिहारमधून लोक येतात आणि इथल्या सगळ्या नोकऱ्या मिळवतात असं वक्तव्य मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं होतं. कमलनाथ यांनी युपी आणि बिहारच्या लोकांबाबत केलेलं विधान चांगलंच महागात पडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कमलनाथ यांच्या विरुद्ध बिहारमधल्या मुझफ्फरपूर इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातही नोकऱ्यांचा प्रश्न आहे, बेरोजगारी आहे. त्यामुळं इथे निर्माण होणाऱ्या नोकऱ्या या स्थानिक लोकांनाच मिळाल्या पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसांमध्येच हे वक्तव्य केल्याने त्यांच्या विरुद्ध टीकेची झोड उठली होती.