कमला मिल आग : युग पाठकला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई  : कमला मिलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी अटकेत असलेला मोजोस बिस्ट्रो पबचा भागीदार युग पाठकला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मोजोसच्या मालकांविरुद्ध वन अबव्हप्रमाणे सदोष मनुष्यवध, निष्काळजीपणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शनिवारी युग पाठकला अटक करण्यात आली.

त्याला रविवारी भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी घडलेली घटना व त्यामागील सत्यता समोर आणण्यासाठी युग पाठकला १५ दिवसांची कोठडी देण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली. मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर त्याला १२ जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.