‘मोजो बिस्ट्रो’ पबचा मालक युग पाठक अटकेत

मुंबई: कमला मिल कम्पाउंडमधील आग प्रकरणी मुंबई पोलिसांनी ‘मोजो बिस्ट्रो’ या पबचा मालक युग पाठक याला अटक करण्यात आली आहे . सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि आग नेमकी कुठून व कशामुळं लागली हे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी हि कारवाई केली आहे.

मागील आठवड्यात कमला मिल कम्पाउंडमध्ये लागलेल्या आगीत ‘वन अबव्ह’ व ‘मोजो बिस्ट्रो’ हे दोन पब जळून खाक झाले होते. तसंच, १४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ‘वन अबव्ह’च्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या आगीचं मूळ ‘मोजो बिस्ट्रो’ होतं. तिथूनच आगीला सुरुवात झाली. नंतर ही आग भडकत जाऊन ‘वन अबव्ह’लाही तिची मोठी झळ लागली, असं चौकशीतून समोर आलं आहे., मोजोचे मालक युग पाठक आणि युग तुली यांच्यासोबतच एका मॅनेजरचं नावही एफआयआरमध्ये आरोपी म्हणून सांगण्यात आलं आहे .