वोह क्या आयटम है ! कमलनाथांची जीभ घसरली

भोपाळ :मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे रविवारी डबरा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्या प्रचार सभेत सहभागी झाले. यावेळी मतदारांना संबोधित करताना कमलनाथ यांनी भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा जास्त ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला पाहिजे होते की, त्या काय आयटम आहेत, असे कमलनाथ यांनी इमरती देवी यांचे नाव न घेता टीका केली

हिंदी बेल्ट राज्य मध्य प्रदेशात सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहते आहे.राजकीय नेतेमंडळीकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राजकीय तोफा शिगेला पोहचल्या आहेत पण यातच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि डबरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांच्यावर आरोप करताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांची जीभ घसरली.

इमरती देवी यांच्यावर टीका करताना कमलनाथ यांनी त्यांचे नाव न घेता त्यांना चक्क आयटम असे संबोधले. दरम्यान, यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

तसेच, कमलनाथ यांनी मतदारांचे कौतुक केले. यावेळी नेते विकले जाऊ शकतात, पण मतदार नाही. त्यामुळे तुम्ही ३ तारखेला सुरेश राजे यांना बहुमताने विजयी करा अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-