कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची तब्ब्येत खालावली,मेदांता रुग्णालयात करण्यात आले दाखल

medanta

नवी दिल्ली- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  कमलनाथ यांना कोरोनाची काही लक्षणे दिसत आहेत.त्यांना ताप आला होता, त्यानंतर त्यांना बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल  करण्यात आले.

फेब्रुवारी महिन्यात, माजी मुख्यमंत्री कमलनाथ मध्य प्रदेशातील इंदूर येथील खासगी रुग्णालयात लिफ्ट पडण्याच्या अपघातातून बचावले होते. त्यावेळी, अपघाताच्या परिणामामुळे घाबरून गेल्यामुळे त्यांची तब्येत ढासळली होती. त्यानंतर रुग्णालयातच त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला होता.

दरम्यान,दुसऱ्या बाजूला बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आलेल्या गुरमीत राम रहीम याला देखील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखीची तक्रार त्याने केल्यानंतर रविवारी रात्री रोहतकच्या सुनारिया तुरूंगातून येथे दाखल करण्यात आले. त्याची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP