कमल हसन यांच्या विधानाचा हिंदू महासभेने केला जाहीर निषेध

टीम महाराष्ट्र देशा- देशातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होते, असे वक्तव्य अभिनेते कमल हसन यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर देशभरातून टीका करण्यात येत आहे. एका बाजूला दहशतवादाला कोणताही धर्म नसतो असं पुरोगामी ठासून सांगत असताना कमल हसन यांनी केलेल्या विधानावर सोयीस्कररीत्या मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चेन्नई येथे निवडणुकीच्या प्रचार सभेत ‘नाथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता’ असे जाहीर वक्तव्य केले होते. कमल हसन यांच्या विधानाचा हिंदू महासभेने जाहीर निषेध केला आहे.तसेच राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित शालेय पाठ्यपुस्तकातील धडा काढून टाकला. याचा देखील त्यांनी निषेध केला. राजस्थान सरकारचा निर्णय देशद्रोही लोकांसाठी उत्तेजन व देशभक्तांसाठी मानहानी ठरणारा आहे, असे मत हिंदू महासभेचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी या दोन्ही प्रकरणाचा निषेध केला आहे.

मी केवळ धार्मिक असहिष्णूतेबद्दल बोलत होतो. कट्टरता मग ती कोणत्याही धर्मातील असू दे त्याचा निषेधच केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे अभिनेते कमल हसन यांनी सारवासारव केली आहे.