fbpx

कमल हसन लढवणार लोकसभा निवडणूक

टीम महाराष्ट्र देशा- भाजप सरकारला वारंवार फैलावर घेणारे अभिनेते कमल हसन यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जाहीर केलं आहे. ‘मक्कल निधी मय्यम’ या राजकीय पक्षाची स्थापना केल्यानंतर पहिल्यांदाच ते लोकसभा लढविणार आहेत.

तामिळनाडू राज्याचा विकास हा मुद्दा घेऊन आमचा पक्ष निवडणूकीत उतरणार आहे. युती करण्यासाठी आम्ही स्वतंत्र आहोत. त्यामुळे समविचार पक्षाशीच आम्ही युती करू असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान त्यांनी सांगितले की, युतीच्या अध्यक्षपदी कोण असेल याबाबत आताच सांगणे शक्य नाही.

नोव्हेंबर महिन्यात आलेल्या गजा या वादळाचा तडाखा बसलेल्या गावांना सध्या हसन भेट देत आहेत. यावेळी पत्रकारांनी लोकसभा निवडणूकीबाबत विचारले असता त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

1 Comment

Click here to post a comment