‘त्यांना म्हातारचळ लागलं आहे’, ‘या’ अभिनेत्रीची कमल हसन यांना सणसणीत चपराक

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेते कमल हसनने निवडणुकांच्या प्रचारादरम्यान हिंदू दहशतवादाबद्दल वक्तव्यावरून वादात अडकले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अभिनेता विवेक ओबेरॉयनेही त्याचं मत दिलं होतं. आता अभिनेत्री पायल रोहतगीने व्हिडिओमार्फत कमल हसन यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे . ‘त्यांना म्हातारचळ लागलं आहे.’ अशी सणसणीत चपराक पायल रोहतगीने हसन यांना लगावली आहे.

‘भारतात लोक राजकारणात करिअर घडवण्यासाठी सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. यासाठी हिंदू दहशतवादासारखा चांगला आणि सर्वात सोपा शब्द दुसरा कोणताही नाही. हिंदू दहशतवाद हा शब्द उच्चारून तुम्हाला सहज टीआरपी मिळतो. आता तुम्ही तरुण तर राहिला नाहीत तुम्हाला म्हाचारचळ लागलं आहे.’ असं पायल म्हणाली आहे. त्याचबरोबर ‘तुम्हाला हे माहीत नाही का की नथुराम गोडसे एक हिंदू ब्राह्मण होता आणि गांधीही हिंदू होते. जेव्हा एक हिंदू दुसऱ्या हिंदूला मारतो त्याला खून म्हणतात. दहशतवाद त्याला म्हणतात ज्यात एक धर्म दुसऱ्या धर्माला नष्ट करू पाहतो. यानुसार स्वतंत्र भारतातील पहिले दहशतवादी पाकिस्तानची निर्मिती करणारे जिना आहेत. जिना यांनी पाकिस्तान वेगळं करण्यासाठी हिंदू, मुस्लिमांसह शिख आणि पारसी लोकांचंही रक्त वाहिलं आहे.’ असं पायल रोहतगी म्हणाली आहे.

तमिळनाडूच्या अरावकुरुची विधानसभा क्षेत्रात कमल हसन आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार करत होते. यादरम्यान त्यांनी नथुराम गोडसेला स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी असा उल्लेख केला. त्यांचं हेच वक्तव्य अनेकांना रुचलं नाही. विवेक ओबेरॉयने ट्वीट करत कमल हसन देशाचे तुकडे पाडत असल्याचं म्हटलं होतं. विवेक नंतर आता पायलही या वादाचा एक भाग झाली आहे. तिने आपला व्हिडिओ शेअर करत ‘त्यांना म्हातारचळ लागलं आहे. त्यांना दहशतवाद आणि खून याच्यातला फरक कळत नाही. अशी टीका केली आहे .Loading…
Loading...