fbpx

हिंदू हा शब्द मुघल आणि परकीय आक्रमणाआधी अस्तित्त्वातच नव्हता : कमल हसन

टीम महाराष्ट्र देशा- हिंदू धर्माबद्दल तसेच नथुराम गोडसेबद्दल आपल्या विविध वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले अभिनेते कमल हसन यांचे आणखी एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. मुघल आणि परकीय आक्रमणा आधी हिंदू हा शब्द अस्तित्त्वातच नव्हता असे वादग्रस्त वक्तव्य हसन यांनी केले आहे. कमल हसन पुन्हा एकदा बरळल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असे वक्तव्य कमल हसन यांनी नुकतेच केले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. चौफेर टीका झाल्यानंतर कमल हसन यांनी प्रत्येक धर्मात दहशतवादी असल्याचे वक्तव्य करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला मात्र हसन यांच्या या वक्तव्यामुळे देखील या वादात आणखी भर घातली होती. आता त्यांनी हिंदू हा शब्द मुघल आणि परकीय आक्रमणाआधी अस्तित्त्वातच नव्हता असे वक्तव्य करून आगीत तेल ओतले आहे.

कमल हसन यांनी तामिळ भाषेत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हिंदू या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन धर्मग्रंथात आढळत नाही असे म्हटले आहे. हिंदू हा शब्द परदेशी आक्रमकांनी आणि मुघलांनी दिला आहे. परकीयांनी दिलेली ही ओळख जपण्यापेक्षा आपण भारतीय ही ओळख जपली पाहिजे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हिंदू हा शब्द धर्मासाठी वापरणे अयोग्य आहे, आपण सगळे भारतीय आहोत. आपली ओळख भारतीयच असली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. शैव, वैष्णव किंवा शाक्त पंथीयांच्या ग्रंथात किंवा इतर प्राचीन धर्मग्रंथांत कुठेही हिंदू या शब्दाचा उल्लेख आढळत नाही. मुघल आणि परकीय आक्रमणाआधी हा शब्दच अस्तित्त्वात नव्हता. ब्रिटिशांच्या राजवटीत त्यांनी हिंदू हा शब्द प्रचलित केला असेही त्यांनी म्हटले आहे.