संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध असताना पंढरपुरात अजितदादांच्या सभेला जमली तौबा गर्दी

kalyan kale

पंढरपूर – पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. तर, भाजपने भगीरथ भालके यांच्या विरोधात समाधान आवताडे मैदानात उतरवलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मुख्य सामना होणार आहे.

दरम्यान,या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मोठा धक्का दिला आहे. कल्याणराव काळे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तौबा गर्दी जमवत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. पंढरपुरात अजित पवारांच्या सभेत तुफान गर्दी झाली होती. यावेळी करोनासंबंधित नियमाचं पालन करण्यात आलं नसल्याने विरोधकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

एका बाजूला महाराष्ट्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी टाळेबंदी करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लावून सर्वसामन्यांना नियमांचे पालन करायला राज्यकर्ते सांगत आहेत. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्रीच जर अशा पद्धतीने नियम मोडत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी पाहायचे कुणाकडे असा सवाल उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या