कोपर्डीच्या निकालानंतर आनंद साजरा करणारे नितीन आगेच्या निकालानंतर गप्प का?- मुणगेकर

न्यायव्यवस्थेत जातीयवाद होत असल्याचा गंभीर आरोप

कल्याण:ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुणगेकर यांनी कोपर्डी आणि नितीन आगे प्रकरणांचा जो निकाल लागला त्याची तुलना केल्याने नवा वाद उभा राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.कोपर्डी प्रकरणात आरोपींना फाशी झाली, तर दुसरीकडे खैरलांजी आणि नितीन आगे प्रकरणात मात्र आरोपी निर्दोष सुटले, हा राज्य सरकारचा हलगर्जीपणा असून न्यायव्यवस्थेत जातीयवाद होतोय, असा गंभीर आरोप मुणगेकरांनी केला आहे.ते कल्याणमध्ये  त्याचबरोबर कोपर्डी प्रकरणाचा जो निकाल लागला त्याचं सर्वांनी स्वागत केलं, मी सुद्धा केलं. मात्र आनंद साजरा करणारे हे नितीन आगेच्या निकालानंतर गप्प का, असा सवाल मुणगेकर यांनी उपस्थित केला.